PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसानच्या हप्त्याआधीच शेतकऱ्यांना गिफ्ट; कृषी मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

PM Kisan Yojana Update: शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अजूनही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याआधीच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

Siddhi Hande

पीएम किसानच्या हप्त्याची अजूनही घोषणा नाही

त्याआधी केंद्रीय कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

आता खताची सब्सिडी थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार

राज्यातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. फेब्रुवारीत पैसे दिले जातील, असं सांगण्यात येत होतं. मात्र, अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याआधीच आता केंद्रीय कृषी मंत्र्‍यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात खताची सब्सिडी लवकरच ट्रान्सफर केली जाणार आहे. तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले आहे, लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. जेणेकरुन शेतकऱ्यांना अजून खते खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.

दिल्ली भारतीय कृषी संस्थेच्या विज्ञान मेळाव्यात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जर युरियाच्या एका पिशवीची किंमत २,४०० रुपये असेल तर सरकार त्यासाठी अनुदान देते. त्यामुळे ही पिशवी शेतकऱ्यांना फक्त २६५ ते २७० रुपयांनी मिळते. आता हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले तर शेतकऱ्यांना कोणते खत खरेदी करायचे हे ठरवण्याची मुभा मिळेल.

सध्या खताची सब्सिडी ही खत कंपन्यांना दिली जाते. कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पडताळणी करुनच अनुदान द्यावे लागते. मात्र, आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने त्यांना स्वतंत्रपणे खत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्त वेळ वाट पाहावीदेखील लागणार नाही. सध्या कंपन्यांची पडताळणी झाल्याशिवाय शेतकऱ्यांना सब्सिडीचा हप्ता मिळत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT