

प्रिय राधा...
फूल तुम्हें भेजा है ख़त में
फूल नहीं मेरा दिल है
प्रीयतम मेरे तुम भी लिखना
क्या ये तुम्हारे क़ाबिल है
प्यार छिपा है ख़त में इतना
जितने सागर में मोती
आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वात भारी दिवस आहे, पण मनात धकधक वाढू लागलीय. हे पत्र वाचल्यानंतर कदाचित आपली मैत्री सुद्धा तुटेल, असं वाटत आहे. पण न बोलताही मला राहता येत नाहीये. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस. डेअरी मिल्कच्या चॉकलेटपेक्षा जास्त.
गेल्या अनेक दिवसापासून मी तुला माझ्या मनातील गोष्ट बोलणार होतो, पण माझी हिमत होत नव्हती. आज अखेर साम डिजीटलच्या व्हॅलेंटाइन डे विशेष मनातलं ओठांवर या उपक्रमातून माझ्या मनातील गोष्ट तुला सांगत आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम भावना आहे. तुला पाहिल्यावर मी अख्ख जग विसरतो, तू आणि तूच मला दिसतेस. मनी ध्यानी तुच तू असतेस. तुला पाहिलं की, सर्व टेन्शन मिटल्यासारखं वाटतं, मन स्थिर होतं.
तुझ्याशी बोलताना मला खूप भारी वाटतं. तुझ्यासोबत गप्पा करताना मला वेळेचं भान नसतं. कितीही बोललो तरी कमीच बोललो असं वाटतं. बोलता बोलता तुझ्या गालावर सतत येणारी तुझी ती बट एखाद्या आईप्रमाणे वाटते, सारखी मध्ये मध्ये येते, पण तू ज्या स्टाइलन ती बट हळूच आपल्या कानामागे करतेस ना. लय भारी.
तुझ्या हसण्यातही एक वेगळीच अदा आहे. लाजून तू जेव्हा हसतेस ना माझ्या नजरा तुझ्यावरून हटत नाहीत. जर मी खूप मोठा माणूस असतो तर तुला तुझ्या त्या गोड हस्यासाठी पुरस्कार दिला असता. बोलताना आणि हसताना तुझ्या ओठांची होणारी हालचाल मनाला वेड लावते. तुझ्यासाठी मी वेडापिसा झालोय, जर तू मला भेटली नाहीस तर मी कदाचित जगू शकणार नाही.
रात्री झोपतानाही तु्झ्याशी गप्पा केल्याशिवाय मला झोप येत नाही. मी तुझ्यासोबत अनेक विषयांवर बोललो पण माझ्या मनातील भावना तुला शब्दातून सांगू शकलो नाही. परंतु या पत्रातून मी माझ्या भावना तुला सांगतो. हे पत्र नाही तर माझं हृदय आहे. प्रत्येक शब्द लिहिताना हृदयाची धडधड वाढतेय. एक वाक्य मी चारवेळा वाचतोय. नाही म्हणून हृदय तोडू नकोस गं. मला तुझ्यावाचून राहवत नाही. तुला पाहिलं नाही तर मन बेचैन होतं. सारखं तुझ्या खुर्चीकडे माझी नजर जाते.
नींद तुम्हें तो आती होगी
क्या देखा तुमने सपना
आँख खुली तो तन्हाई थी
सपना हो न सका अपना
जेव्हा तू वन पीस घालून ऑफिसला येतेस ना तर अख्ख्या ऑफिसमधील मुलांच्या नजरा तुझ्यावर भिरभीरतात. पण माझ्या मनाची घालमेल होते, तुला कोणी असं पाहिलं तर माझं डोकं फिरतं. त्या कपड्यांमध्ये मीच तुला पाहावं असं वाटतं.
कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है
के ये बदन ये निगाहें मेरी अमानत हैं
ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर
ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं
तुला माहितीये, मागच्या महिन्यात जेव्हा तुझा वाढदिवस साजरा केला होता, त्यावेळी तू मला सर्वात आधी केक भरवला होतास, त्यावेळी सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकांच्या गॉसिपमध्ये आपली चर्चा होती. पण तुला सांगू मला तू खूप आवडतेस. मी तुझ्यावर मरतो.
तुझाच मी...
श्याम
पुणे, चंदननगर
मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?
जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!
प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!
आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...
भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...
तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.