KDMC Hospital: प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला बांधला पुठ्ठा; केडीएमसी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

KDMC Hospital: कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा बांधला. रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आलाय.
KDMC Hospital
KDMC HOSPITAL NEGLIGENCE? CARDBOARD USED INSTEAD OF PLASTER FOR FRACTURE PATIENTsaam tv
Published On
Summary
  • रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित निष्काळजीपणाचा प्रकार समोर

  • फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठ्याचा आधार

  • या प्रकारामुळे KDMCच्या आरोग्य व्यवस्थेतील सुविधा आणि रुग्णसेवेवर प्रश्न उपस्थित

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित बेजबाबदार कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पायाला फ्रॅक्चरचे प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठ्याचा आधार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर प्लास्टरचे साहित्य रुग्णालयात संपले असल्याचे सांगून ते बाहेरून आणण्यासाठी एका कर्मचाऱ्याने ४०० रुपयांची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

KDMC Hospital
Kalyan : धक्कादायक! साडेपाच वर्षांत 1.12 लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा, कल्याण-डोंबिवलीकरांनी घेतला धसका

या प्रकाराची माहिती मिळताच मनसेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात संताप व्यक्त करत जाब विचारला. त्यामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळानंतर औषध विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयातील स्टोअरची पाहणी केली. यावेळी फ्रॅक्चरच्या प्लास्टरसाठी लागणारा साहित्याचा पुरेसा साठा स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.

KDMC Hospital
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे २० दिवसांनंतर तुरुंगाबाहेर

त्यामुळे रुग्णालयात प्लास्टरचे साहित्य उपलब्ध असतानाही रुग्णाला बाहेरून साहित्य आणण्यास का सांगण्यात आले? तसेच पायाला प्लास्टर करण्याऐवजी पुठ्ठ्याचा आधार का देण्यात आला? आणि ४०० रुपयांची मागणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून रुग्णाला योग्य उपचार न देणाऱ्या तसेच बाहेरून साहित्य आणण्यास सांगणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, रुग्णालयातील साहित्याचा साठा उपलब्ध असूनही रुग्णांना बाहेरून साहित्य आणण्याची वेळ येत असेल, तर महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात केडीएमसी प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com