PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार? या दिवशी खात्यात येऊ शकतात ₹२०००

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे. हा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा केले जाऊ शकतात.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत अपडेट

२२वा हप्ता कधी येणार?

होळीआधी पैसे जमा होण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा ९ कोटी शेतकरी लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहे. शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, आता हा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० कधीही येऊ शकतात; त्याआधी हे काम कराच, अन्यथा...

पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. आता हा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. यंदा होळी २-३ मार्चला आहे. त्याआधी पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, अजूनही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पीएम किसान योजनेचे हप्ते दर ४ महिन्यांनी दिले जातात. शेवटचा म्हणजेच २१वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला गेला होता. हा हप्तादेखील उशिरा आला होता. यानंतर २२वा हप्ता फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता होती. मात्र, अजूनही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आता हा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan 22nd Instalment: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये येणार? PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

पीएम किसानचा हप्ता कधी येणार? (PM Kisan Yojana 22nd Installment Date)

पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मिडिया रिपोर्टनुसार मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० रुपये जमा केले जाऊ शकतात. होळीआधी पैसे येण्याची शक्यता जास्त आहे. आज २५ फेब्रुवारी आहे. फेब्रुवारी महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे हप्ता पुढच्या महिन्यात येणार, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे.

PM Kisan Yojana
Government Scheme: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १.५० लाख रुपये, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com