PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: ३१ लाख शेतकर्‍यांचा पत्ता कट, 'पीएम किसान'च्या पडताळणीनंतर कारण आलं समोर; तुमचं नाव तर नाही ना?

PM Kisan Yojana Beneficiaries List: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएम किसान योजनेतून अपात्र लाभार्थ्यांची यादी काढण्यात आली आहे. यातून ३१ लाख लाभार्थ्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

३१ लाख लाभार्थ्यांनी निकषाबाहेर जाऊन घेतला लाभ

या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत पैसे

कोट्यवधी कर्मचारी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे. पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल. दिवाळीआधी हा हप्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता या योजनेबाबत अजून एक अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने नियमाबाहेर जाऊन चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण ३१ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे या यादीत आहे.

३१ लाख लाभार्थ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता (31 Lakh Farmers Will Not Get PM Kisan Yojana Installment)

केंद्र सरकारच्या म्हणण्यांनुसार, एका कुटुंबातील पती आणि पत्नी असे दोन्ही लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. नियमानुसार कोणत्याही कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ज्या कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती योजनेचा लाभ घेत आहेत त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ३१ लाभार्थ्यांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ३१.०१ लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातीन १७.८७ लाख लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत पडताळणी सुरु आहे. यातून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

मुलांनाही मिळतायत ६००० रुपये

दरम्यान, या पडताळणीत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास १.७६ लाख अल्पवयीन मुले या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ३३.३४ लाख लाभार्थ्यांनी जमिनीबाबत दिलेली माहिती चुकीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना वगळून टाकण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT