Manasvi Choudhary
केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आहे.या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते.
या योजनेअंतर्गत एकूण ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत वर्षभरात तीन हप्ते दिले जातात.
४ महिन्यानंतर २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. .या योजनेच्या २१ वा हप्ता आता दिला जाणार आहे.
मात्र आता सरकारच्या नियमांनुसार काहीच शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे, तुम्हाला मिळणार आहे की नाही हे जाणून घ्या.
तुम्हाला PM- Kisan या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल येथे तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता.
वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला नो युअर स्टेटस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. पुढे नोंदणी क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा टाका.
कॅप्चा कोड टाकल्यानंतर 'तपशील मिळवा' या बटणावर क्लिक करा.
यानंतर तुमची स्थिती स्किनवर प्रदर्शित होईल ज्यावर तुम्हाला २१ वा हप्ता मिळेल की नाही हे समजेल.