PM Kisan Yojana google
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'हे' काम अन्यथा २००० रूपये मिळणार नाहीत, महत्त्वाची अपडेट समोर

PM Kisan 24th Installment : पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. e-KYC, आधार आणि बँक खात्याची पडताळणी आणि Beneficiary Status तपासून अर्जातल्या चुका लगेचच दुरुस्त करा.

Sakshi Sunil Jadhav

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. त्यातच पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ आत्तापर्यंत अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता या योजनेचा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे. पण यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण ६ हजार रुपये वर्षाला दिले जातात. यामध्ये वर्षाला २००० हजाराचे ३ हप्ते दिले जातात. आता पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता (PM Kisan 24th Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण तुम्ही केवायसी प्रोसेस पूर्ण केली नाही, आधार आणि बँक खात्याच्या माहितीतल्या चुका किंवा इतर तांत्रिक समस्यांमुळे शेतकऱ्यांना हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो.

२४ वा हप्ता येण्याआधी करा हे काम

तुम्ही या योजनेचे रेकॉर्ड्स काही सोप्या स्टेप्सने तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम, pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. मग होमपेजवर, 'Know Your Status' किंवा 'Beneficiary status' या ऑप्शनवर क्लिक करा. तिथे ओटीपी टाका.

त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती, मागच्या हप्त्यांची नोंद आणि तुमच्या पुढील हप्त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला यामध्ये काही चुका किंवा समस्या आढळल्या तर तिथल्या तिथे तुम्ही दुरुस्त करून घ्या. ही सोपी प्रोसेस केल्याने तुम्हाला न रखडता पुढील हप्ता खात्यात जमा होईल. पण लक्षात ठेवा  e-KYC  प्रोसेस पूर्ण करणं अनिवार्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT