EPFO Update : PF चा पैसा दुप्पट करण्याच्या नादात कंगाल व्हाल? EPFO चा गंभीर इशारा; 'हा' निर्णय येईल अंगाशी

EPFO Warning : EPFO ने कर्मचाऱ्यांना पीएफचे पैसे काढून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. EPF मध्ये पेन्शन, विमा, करसवलत आणि सुरक्षित परताव्याचे महत्त्वाचे फायदे मिळतात.
EPFO Update
EPFO Updatechatgpt
Published On

कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी समोर आली आहे. तुम्ही जर दरमहा EPFO मध्ये पीएफ जमा करत असाल तर तुम्हाला त्याचे काही नियम माहित असणं गरेजचं आहे. सध्या सर्वांना असा प्रश्न पडलाय की, EPF (Employees' Provident Fund) चे पैसे काढून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतो का? याबद्दल पुढील मुद्द्यात जाणून घेऊयात.

livehindustan ने दिलेल्या माहितीनुसार, EPFO (Employees' Provident Fund Organisation) ने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा इशारा देत सांगितलं की, EPF आणि म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या उद्देशांसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्हींची तुलना करणं किंवा एकाला दुसऱ्याच्या पर्याय मानणं योग्य नाही.

EPFO Update
Gold Price Today : सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा तब्बल 'इतक्या' रुपयांनी घटले भाव; पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

EPFO ने आपल्या पोस्टमध्ये '' समजूतदाराला EPF पुरेसा आहे'' असा मेसेज देत व्हिडिओही शेअर केला आहे. संस्थेच्या मते, EPF ही फक्त बचत योजना नसून रिटायरमेंटनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी सामाजिक सुरक्षा योजना आहे.

EPF मध्ये कर्मचारी आणि नियोक्ता (Employer) दोघंही महिन्याला पैसै जमा करतात. त्यामुळे कालांतराने मोठी रिटायरमेंट निधी तयार होतो. दुसरीकडे, म्युच्युअल फंडात फक्त गुंतवणूकदारच पैसे भरतो आणि त्यामध्ये कंपनीकडून कोणतंही योगदान मिळत नाही.

EPF वर मिळणारा व्याजदर सरकार दरवर्षी ठरवतं. त्यामुळे तुलनेने स्थिर आणि सुरक्षित परतावा मिळतो. तर म्युच्युअल फंडाचा परतावा हा शेअर बाजारातल्या चढ - उतारावर अवलंबून असतो. बाजारात तेजी असेल तर चांगला नफा मिळू शकतो, मात्र घसरण झाल्याने नुकसान होण्याची शक्यता असते.

EPFO च्या माहितीनुसार, EPF सोबत EPS (Employees' Pension Scheme) आणि EDLI (Employees' Deposit Linked Insurance) यांचाही लाभ मिळतो. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ७ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकतं. म्युच्युअल फंडात अशा प्रकारच्या सुविधा सामान्यत: उपलब्ध नसतात.

EPFO Update
Side Effects of Sabudana : सावधान! 'हे' ३ आजार असतील तर साबुदाणा अजिबात खाऊ नका; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

टॅक्ससवलीच्या दृष्टीनेही EPF जास्त फायदेशीर मानले जाते. ठराविक अटी पूर्ण झाल्यावर जमा रक्कम, व्याज आणि पैसे काढताना करसवलत मिळू शकते. तर म्युच्युअल फंडामध्ये टॅक्सचे नियम फंडाचा प्रकार आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार बदलतात. तज्ज्ञांच्या मते, जास्त परताव्याच्या आशेने पीएफचे पैसे काढण्याऐवजी रिटायरमेंटच्या सुरक्षिततेसाठी EPF कायम ठेवणं जास्त शहाणपणाचं ठरू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com