Sakshi Sunil Jadhav
आषाढी एकादशी म्हटलं की, उपवासाच्या ताटात साबुदाणा येतोच. यापासून बनवलेले अनेक पदार्थ आपण या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात खातो.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर काही विशिष्ट आजारांनी ग्रस्त असाल तर तुम्ही साबुदाणा खाणं टाळलं पाहिजे.
साबुदाण्यात कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे घटक असतात.
साबुदाण्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन वाढू शकतं.
साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे रक्तातली साखर झपाट्याने वाढू शकते.
साबुदाण्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे शरीरात प्रोटीनची कमी असल्यामुळे फक्त साबुदाणा खाऊन ती भरून निघत नाही.
किडनी स्टोनची समस्या असलेल्या व्यक्तींनी साबुदाणे कमी प्रमाणात खावे. आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त सुरक्षित ठरते.
सर्वसामान्य निरोगी व्यक्तींनीही साबुदाण्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कोणताही दीर्घकालीन आजार असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.