PM Kisan Yojana 24th Installment Increase or Not google
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

PM Kisan Yojana 24th Installment Increase or Not: पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याआधी वार्षिक ६००० रुपयांच्या मदतीत वाढ होणार नसल्याचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे. पात्र शेतकऱ्यांना २००० चाच हप्ता मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकर्‍यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना (PM Kisan Yojana ) राबवली जाते. यामध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला एकूण ६ हजार रुपये जमा केले जातात. वर्षात एकूण ३ तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. सध्या यामध्ये निधी वाढवण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात २३ वा हप्ता जमा झालेला आहे. आता २४ व्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू असताना या निधीत वाढ होणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यातच या विषयावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सरकारकडून उत्तर दिलेलं आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेच्या वार्षिक आर्थिक मदतीत वाढ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या मिळणारी ६ हजार रुपयांची मदत वाढवून ती ९ हजार रुपये करण्यात यावी, अशी अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे २४ व्या हप्त्याआधी सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण यावर आता केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे.

लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की, पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक ६ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा सध्या सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नाही. यामुळे पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्यामध्येही पात्र शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे २ हजार रुपयांचाच हप्ता मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यात कोणताही बदल झाला की, सरकार अधिकृत घोषणा करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT