महाराष्ट्रभर UPSC-MPSC अभ्यासिका, परभणीतील शाळेला १ लाखांची मदत; राष्ट्रवादीच्या नेत्यानं दिलेला शब्द पाळला!

Maharashtra to Get 35 UPSC-MPSC Study Centres : परभणी दौऱ्यादरम्यान सलीम सारंग यांनी फैज कॅम्पसला स्मार्ट डिजिटल बोर्डसाठी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच महाराष्ट्रभर ३५ अभ्यासिका केंद्रे सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Salim Sarang Donates ₹1 Lakh To Parbhani School, Announces 35 Study Centres
Salim Sarang Donates ₹1 Lakh To Parbhani School, Announces 35 Study Centres
Published On: 
Summary
  • १५ ऑगस्ट रोजी दिलेला स्मार्ट डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्याचा शब्द पूर्ण केला.

  • २४ नोव्हेंबर रोजी परभणी दौऱ्यादरम्यान धनादेश सुपूर्द

  • महाराष्ट्रभर यूपीएससी आणि एमपीएससीसाठी ३५ अभ्यासिका केंद्रे सुरू करण्याचा संकल्प

आश्वासन देणारे अनेक असतात, मात्र दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करणारे मोजकेच असतात. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तथा मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी याचा प्रत्यय परभणीतून दिला आहे.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आयोजित भव्य महिला बचत गट मेळाव्याच्या निमित्ताने 24 नोव्हेंबर रोजी परभणीत आलेले सलीम सारंग यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेला शब्द पूर्ण केला. परभणी येथील फैज कॅम्पसला त्यांनी १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

Salim Sarang Donates ₹1 Lakh To Parbhani School, Announces 35 Study Centres
सुनेत्रा पवारांनी पक्षात भाकरी फिरवली! उपाध्यक्षपदी 'या' नेत्याची निवड, राष्ट्र्रवादीत मोठा उलटफेर

१५ ऑगस्ट रोजी परभणी येथील फैज कॅम्पस येथे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. विशेषतः यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, हा त्यामागील उद्देश ह

Salim Sarang Donates ₹1 Lakh To Parbhani School, Announces 35 Study Centres
अतिक्रमण हटावनंतर पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम; मनपाकडून पुणे विद्रुपीकरणाचा पुरस्कार जाहीर

आपल्या परभणी दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत फैज कॅम्पसला १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. हा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक सनाउल्लाह खान, शिक्षक सोहेल खान व शाळेतील कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

यावेळी सलीम सारंग यांनी आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३५ अभ्यासिका केंद्र सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.