PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: मार्च उजाडला तरी पीएम किसानचा हप्ता नाही; शेतकऱ्यांना ₹२००० कधी येणार?

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. मार्च महिना सुरु झाला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार

होळीनंतर खात्यात येऊ शकतात पैसे

शेतकऱ्यांना ₹२००० प्रतिक्षा

पीएम किसान योजनेचा ९ कोटी शेतकरी लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, अजूनही शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी महिना संपला आहे तरीही पैसे न आल्याने खूप प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं बोललं जात होतं.

उद्या म्हणजेच २ मार्च रोजी होळी आहे. त्याआधी पैसे जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे. जर होळीला पैसे येणार असते तर घोषणा केली असती. मात्र, अजूनही पीएम किसानच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खूप प्रश्न पडले आहेत.

पीएम किसान योजनेत आता होळीनंतरच २००० रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. दरम्यान, हप्ता जमा करण्याआधी अधिकृतपणे घोषणा केली जाईल. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या घोषणेकडे लागल्या आहेत.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पैसे

पीएम किसान योजनेचे काही निकष आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळतो. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी आधी केवायसी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT