PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे ₹२००० मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा सविस्तर

PM Kisan Yojana 22nd Installment Farmer ID: पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. या योजनेसाठी फार्मर आयडी गरजेचे आहे. फार्मर आयडी कसं बनवायचं ते जाणून घ्या.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेसाठी फार्मर आयडी गरजेचे

फार्मर आयडीशिवाय मिळणार नाही ₹२०००

फार्मर आयडी कसं बनवायचं?

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसीसोबतच आता फार्मर आयडीदेखील महत्त्वाचे आहे. काही राज्यांमध्ये केवायसी करण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे.

या राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवण्यास सुरुवात

जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहेत. देशातील १४ राज्यांमध्ये फार्मर आयडीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात झाली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये फार्मर आयडी बनवण्यास सुरुवात झाली आहे.तुम्ही ऑनलाइन पद्धतीने फार्मर आयडी बनवू शकतात.

फार्मर आयडी बनवण्याची प्रोसेस (Farmer ID Registartion)

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या राज्यातील AgriStack Portal वर जायचे आहे. यानंतर न्यू युजरवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर केवायसी करावी लागणार आहे.

यानंतर सर्व अटी मान्य करायच्या आहेत. त्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाकून व्हेरिफिकेशन करा.

यानंतर तुमचा युजर आयडी तयार होईल.यानंकर लॉग इन करा.

यानंतर फार्मर टाइपमध्ये ओनर हा ऑप्शन निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यायची आहे.

यानंतर तुम्हाला Social Registry Tab मध्ये फॅमिली आयडी किंवा रेशन कार्डची माहिती भरायची आहे.

यानंतर तुम्हाला अप्रुवल घ्या. यानंतर तुमचा फार्मर आयडी तयार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT