PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. पैसे कधी येणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

२२वा हप्ता कधी येणार?

या दिवशी होऊ शकते घोषणा

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत २२वा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता लांबणीवर गेला आहे. हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता होती. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. आता लवकरच पैसे दिले जातील.

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यानच २२व्या हप्त्याची घोषणा केली जाऊ शकते.

या दिवशी होऊ शकते घोषणा

आसामच्या मंत्र्यांनी माहिती दिली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या कोकराझार दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी राज्याच्या विकासच्या प्रोजेक्टसची पायाभरणी करणार आहे.विधानसभा निवडणुकीआधी पीएम मोदींचा दौरा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत २२ व्या हप्त्याची घोषणा होऊ शकते.दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पीएम किसान योजनेत २१वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जमा झाला होता. पीएम किसान योजनेचा २२ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.दरम्यान, अजूनही पैसे जमा झाले नाहीत.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम करावे

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटींचे पालन करावे लागणार आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे. केवायसी तुम्ही ऑनलाइन- ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. याचसोबत जमिनीच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करावे लागते. त्यानंतरच तुम्ही पात्र असाल तर योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT