शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.आता लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यात पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता वितरित केला आहे. इतर राज्यातील शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, इतर राज्यातील शेतकऱ्यांना घाबरण्याची काही गरज नाही. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी पैसे जमा केले जातात. वर्षभरात शेतकऱ्यांना ६००० रुपये जमा केले जातात. या योजनेत २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी जमा केला होता. हा हप्ता लांबणीवर गेला होता. जून महिन्याचा हप्ता जवळपास २ महिने उशिरा देण्यात आला होता. त्यामुळे यापुढचे हप्तेदेखील उशिरा येण्याची शक्यता वर्तवली जात होती.
पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता ऑक्टोबरमध्ये वितरित केला जाईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीआधी कदाचित शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातील. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी कदाचित दिवाळीआधी पैसे येऊ शकतात. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यातील शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. पूरबाधित राज्यांनी आधी मदत दिली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही पैसे लवकरच दिले जातील.
पैसे आले की नाही अशा पद्धतीने करा चेक
पीएम किसान योजनेचा हप्ता डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्यावर शेतकऱ्यांना मेसेज येईल. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे आले की नाही चेक करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.