Namo Udyan Scheme 2025 : ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १ कोटींचा निधी, एकनाथ शिंदेंची घोषणा

PM Narendra Modi Birthday: महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी एक कोटी निधीतून ‘नमो उद्यान’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On
Summary
  • राज्यातील सर्व ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये ‘नमो उद्यान’ उभारली जाणार.

  • प्रत्येक उद्यानासाठी महाराष्ट्र सरकारकडून १ कोटी निधी मंजूर.

  • विभागीय स्तरावर स्पर्धा होणार; विजेत्या नगरपरिषदांना कोटींची बक्षिसे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना राबविण्यात आली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत,नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde
Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद/नगरपंचायतींना बक्षिसे देखील देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला आहे.

Eknath Shinde
Narendra Modi : मी भगवान शिवाचा भक्त, सगळं विष गिळून टाकलंय; PM नरेंद्र मोदी आसामध्ये नेमकं काय म्हणाले?

नमो उद्यानांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषीक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहिर करण्यात येतील. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी, द्वितीय तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये अशी बक्षिसाची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना देण्यात येणार आहे.

Q

नमो उद्यान योजना काय आहे?

A

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी एक कोटी निधीतून उद्यान उभारण्याची ही योजना आहे.

Q

ही घोषणा कशासाठी करण्यात आली?

A

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे.

Q

या योजनेंतर्गत किती नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा समावेश आहे?

A

राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करण्यात येतील.

Q

उद्यान स्पर्धेतील विजेत्यांना काय मिळणार?

A

प्रथम क्रमांकाला ५ कोटी, द्वितीयला ३ कोटी आणि तृतीय क्रमांकाला १ कोटी अतिरिक्त विकास निधी मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com