
पंतप्रधान मोदींनी आसाममध्ये साडे सहा कोटी रुपयांच्या विकास योजनांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःला भगवान शिवाचा भक्त असल्याचं म्हटलं
मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं श्रेय माँ कामाख्याच्या आशीर्वादाला दिलं
भारतरत्न पुरस्कारावरून मोदींची काँग्रेस नेत्यांच्या विधानावर टीका
आसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडे सहा कोटी रुपयांच्या विकास योजनाबाबत मोठी घोषणा केली. याच आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमात घोषणा करताना काँग्रेसवरही निशाणा साधला. 'मी भगवान शिवाचा भक्त आहे. सगळं विष गिळून टाकलं आहे,असं पंतप्रधान नरेंद्र म्हणाले. यावेळी माँ कामाख्याच्या आशीर्वादामुळे ऑपरेशन सिंदूरला यश मिळाल्याचाही मोदींनी उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी आम्ही भारररत्न सुधाकंठ भूपेन हजारिका यांचा जन्मदिवस साजरा केला. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या पूर्वजांनी आसामसाठी जी स्वप्न पाहिली होती, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचं डबल इंजिन सरकार काम करत आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या नेत्याचं विधान दाखवलं. 'नाचणं गाणाऱ्यांना भारतरत्न दिलं जात आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेत्याने केल्याचे मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटलं की, 1962 साली चीनसोबत युद्ध झालं होतं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या वक्तव केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे आजही ईशान्य राज्यात राहणाऱ्या लोकांच्या जखमा भरलेल्या नाहीत. त्यात काँग्रेसची पीढी त्या जखमांवर मीठ चोळत आहे. साधारणपणे लोक मला हव्या तितक्या शिव्या देऊ शकतात. मी भगवान शिवाचा भक्त आहे. मी सगळं विष गिळतो. पण दुसऱ्याच्या निर्लज्जपणे अपमान केला जातो, तो सहन करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
'मला ठाऊक आहे. काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टम माझ्यावर तुटून पडली आहे. माझ्यासाठी लोक दैवत आहे. माझ्या दैवताजवळ जाऊन बोलू शकत नसेल, तर कुठे बोलेल. तेच माझे स्वामी असून माझ्यासाठी पूजनीय आहे. तेच माझे रिमोट कंट्रोल आहे. त्यांच्याशिवाय कोणी माझं रिमोट कंट्रोल नाही, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.