Maharashtra Politics : मुंबई मोठा राडा; ठाकरे आणि शिंदे गट भिडला, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Political News : प्रभादेवीत ठाकरेसेना आणि शिंदेसेना आमनेसामने आलीय. मात्र दोन्ही पक्षात नेमका राडा का झाला? या राड्याआधी प्रभादेवीत नेमकं काय घडलं होतं? आमदार महेश सावंत विरुद्ध सदा सरवणकर संघर्ष पुन्हा का पेटलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Maharashtra Politics
Uddhav thackeray and eknath shinde Saam tv
Published On

प्रभादेवीत हा राडा झालाय ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये.. आणि या राड्याला कारण ठरलयं... प्रभादेवी सर्कलचं सुशोभिकरण.. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभिकरणाची वर्कऑर्डर असल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यानी केला.. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेंकाना शिवीगाळ करत.. जोरदार घोषणाबाजी केली...राड्याचा हा व्हिडिओ पुन्हा पाहा...

दरम्यान राड्यानंतर दादर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे आमच्याकडे वर्कऑर्डर असल्यामुळे काम करत होतो,मात्र आमच्या कॉन्ट्रॅक्टरला धमकवण्यात आलं, असा आरोप शिंदेसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केलाय.

Maharashtra Politics
35 गुण मिळवणारा मेरिटमध्ये येत नाही, त्यालाही अभ्यास करावा लागतो; सुधीर मुनगंटीवारांनी कुणावर साधला निशाणा?

प्रभादेवीमधील राड्यामागे शिंदेसेना आणि ठाकरेसेनेत अनेक वर्षांपासून सुरु असलेला अंतर्गत संघर्षही कारणीभूत आहे...

2017 साली प्रभादेवी वार्डमध्ये महेश सावंत यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून समाधान सरवणकरांविरोधात पालिका निवडणुक लढवली होती. त्यानंतर सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर शिवसेनेच्या फुटीनंतर 2023 मध्ये गणेशोत्सवात प्रभादेवीत सावंत आणि सरवणकर समर्थक आमनेसामने आले होते.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर सावंत यांच्या समर्थकांकडून सरवणकरांवर कारवाईची मागणी केली गेली. त्यातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी सदा सरवणकरांच्या पराभव केल्यानंतर संघर्षाची धग आणखी वाढलीय.

Maharashtra Politics
Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

दुसरीकडे जिथे भ्रष्टाचार असेल तिथे आम्ही लढणारच अशी प्रतिक्रिया ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादासाठी शिंदेसेना आणि ठाकरेसेना आमनेसामने आलीय. सावंत विरुद्ध सरवणकर वादाचा हा नवा अध्याय आगामी निवडणुकीत प्रभादेवी वॉर्डातील चुरस कायम राखणार असल्याच या राड्यानंतर अधोरेखित होतयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com