PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; कारण काय? वाचा

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केली जातील.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत अपडेट

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार पैसे

या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच दिले पैसे

भारत हा कृषीप्रधान देश आहे.देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारने खास योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता २१वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामध्ये सध्या बिहार विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. ही निवडणून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे.दरम्यान, या निवडणुकांच्या आधी पैसे दिले जातील.

काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात आली आहे. २६ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशमधील शेतकऱ्यांना पैसे दिले होते. या राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत. जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांनादेखील ७ ऑक्टोबर रोजी पैसे देण्यात आले आहे. त्यानंतर इतर राज्यातील शेतकऱ्यांना २१व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.

पीएम किसान योजना २०१९ रोजी सुरु करण्यात आली होती. या योजनेत आतापर्यंत २० हप्ते देण्यात आले आहे.दरम्यान आता हा २१वा हप्ता फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. हप्ता मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच केवायसी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्या बाप बेटाच्या जोडीला अटक

GST नोंदणी आणखी सोपी होणार,फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार

Salt Remedies: आयुष्यात समस्या? तर मीठाशी संबधित 'हे' उपाय कराच, भाग्य उजळेल

SCROLL FOR NEXT