PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: ९ कोटी पोशिंद्याच्या खात्यावर ४८ तासात ₹२००० येणार; या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले, तुमचं नाव तर नाही ना?

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेअंतर्गत १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसै जमा केले जाणार आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता लवकरच जमा होणार

या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपये

पीएम किसान योजनेचा स्टेट्स कसा चेक करायचा?

तुमचंही लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहे का?

पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दोन दिवसात २१वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात १९ नोव्हेंबर रोजी २००० रुपये जमा केले जाणार आहे. केंद्र सरकारने याबाबत घोषणा केली आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. लाखो शेतकऱ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे जाणून घ्या.

तुम्हाला पीएम किसानचे २००० रुपये मिळणार का?

पीएम किसान योजनेत फक्त जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. जर तुम्ही निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, तुम्हाला पैसे मिळणार की नाही, याबाबत स्टेट्‍स तुम्ही चेक करु शकतात.

लाडकी बहीण योजना स्टेट्‍स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status Check Process)

तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in वर जायचे आहे.

यानंतर Beneficiary List वर क्लिक करा.

यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करायचे आहे.

यानंतर Get Report वर क्लिक करा.

या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. जर या यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यामागे अनेक कारणे असू शकतात.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ (These Farmers Will not Get PM Kisan Yojana Benefit)

पीएम किसान योजनेत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही.केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे. याचसोबत बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, जर तुम्ही चुकीचे कागदपत्र अपलोड केले असेल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन दिवस Work From Home, मंत्र्यांच्या ताफ्यात कपात; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय

गुजरातचा धमाकेदार विजय; आक्रमक गोलंदाजीपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, शुभमनचा संघ ठरला नंबर वन

Earthquake In Hingoli:भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली हादरली; प्रशासनाकडून नागरिकांना सूचना

विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, जुने वाद मिटतील; ५ राशींच्या लोकांच्या कर्माचा हिशोब होणार

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला मागून धडकली कार; एकाचा जागीच मृत्‍यू

SCROLL FOR NEXT