

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
या शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम लगेच करा
देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत.पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी शेतकरी आता २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात २१वा हप्ता येणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. दरम्यानस आता या योजनेतील काही शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत.
या शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये (These Farmers will get 4000 Rupees)
पीएम किसान योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. योजनेत आतापर्यंत एकूण २० हप्ते दिले आहेत. मागील हप्ता हा ऑगस्ट महिन्यात दिला गेला आहे. दरम्यान, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना मागचा हप्ता मिळाला नाही. त्यांना यावेळी एकत्र दोन हप्ते येण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा केले जाण्याची शक्यता आहे.
मागील काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित कागदपत्रे अपलोड केली नसतील किंवा जमिनीच्या रेकॉर्डमध्ये काही फरक आढळला तर त्यांना योजनेतून बाद केले होते. दरम्यान, आता ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे नीट दिली आहेत आणि ते लाभ घेण्यासाठी पात्र आहेत तर त्यांना कदाचित दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी हे काम लगेच करा
तुम्हाला ईकेवायसी पूर्ण करायची आहे.
आधार आणि बँक खाते लिंक करा अन्यथा पैसे येणार नाहीत.
जमिनीची पडताळणी करा आणि रेकॉर्ड अपडेट करा.
तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करा.
मोबाईल नंबर अपडेट ठेवा जेणेकरुन तुमच्या फोनवर ओटीपी येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.