PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

PM Kisan Yojana 21st Installment Date: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत माहिती समोर आली आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार?

पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा

पीएम किसान योजनेबाबत अपडेट

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत २० हप्ते देण्यात आले आहेत. दरम्यान, आता २१वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहेत. आता या योजनेत दिवाळीआधी पैसे येणार की नाही असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट रोजी जमा करण्यात आला होता. दरम्यान, २१वा हप्तादेखील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. ज्या राज्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या राज्यातील शेतकऱ्यांना हप्ता दिला आहे. पंजाब, जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे. त्यानंतर आता इतर राज्यातील शेतकऱ्यांना २१व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो? (PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. एका कुटुंबातील फक्त एकाच शेतकऱ्यांना हा लाभ मिळतो. शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपर्यंत जमी असावी. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करावे लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.याबाबतची सर्व माहिती pmkisan.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कधीपर्यंत वाट पाहावी लागणार? (PM Kisan Yojana 21st Installment Date)

सरकारने हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना २००० रुपये दिले आहेत. इतर राज्यातील शेतकऱ्यांना वाट पाहावी लागू शकते. दरम्यान, दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर पडताळणी पूर्ण झाली नाही तर हा हप्ता नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT