महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा हप्ता २९ सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे.त्यामुळे राज्यातील महिला खूप आनंदाच आहे. त्याचसोबत आता पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम सन्मान निधी योजनेचा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्यांनी २००० रुपये मिळतात.दर वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला दिले जातात. अप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात.(PM Kisan Sanman Nidhi Yojana)
पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली . या योजनेअंतर्गत पैसे थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातात. या योजनेअंतर्गत पैसे मिळाले की नाही याचा स्टेट्स चेक कसा करायचा याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
अर्जदार आपला स्टेट्स कसा चेक करणार?
सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर Know Your Status वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमचा नंबर, कॅप्चा कोड टाकून Get Data वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्स दिसेल. (PM Kisan Sanman Nidhi Yojana 18th Installment)
सर्वप्रथम तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
त्यानंतर Benificiary List या टॅबवर क्लिक करा.
त्यानंतर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, तालुका, गाव याबाबत माहिती भरावी. त्यानंतर Get Report वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर लाभार्थ्यांची यादी दिसेल. याचसोबत अधिक माहितीसाठी १५५२६१ किंवा २४३००६०६ या मोबाईल नंबरवर कॉल करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.