PF Balance Saam Tv
बिझनेस

PF Balance: PF खात्यात आतापर्यंत किती पैसे जमा झाले? घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करा चेक

PF Balance Check Online: प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा केली जाते. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा केले हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला आपल्या पगारातील ठरावीक रक्कम जमा होते. यामध्ये १२ टक्के रक्कम जमा केली जाते. काही रक्कम ही कर्मचारी आणि काही रक्कम कंपनीकडून जमा केली जाते. पीएफ अकाउंटमध्ये जमा होणारी रक्कम ही एक गुंतवणूक असते.

EPFO हे तुमचे पीएफ अकाउंट मॅनेज करते. या अकाउंटमध्ये तुमचे आतापर्यंत किती पैसे जमा झाले हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात.तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तुमच्या पीएफ अकाउंटबाबत माहिती मिळवू शकतात.

अशा पद्धतीने चेक करा बॅलेंस (How To Check PF Balance)

तुम्ही EPFO पोर्टलवर जाऊन पीएफ बॅलेंसबाबत माहिती मिळवू शकतात.

सर्वप्रथम EPFO पोर्टला जावे.

त्यानंतर Our Services सेक्शनमध्ये जावे. त्यानंतर For Employees वर क्लिक करा.

यानंतर पासबुक या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमचा यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका.

यानंतर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमधील बॅलेंस चेक करु शकतात.

SMS द्वारे चेक करु शकतात पीएफ बॅलेंस

तुम्ही रजिस्टर नंबरवरुन 7738299899 नंबरवर मेसेज करायचा आहे.

तुम्ही EPFOHO UAN असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मेसेजवर पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.

मिस्ड कॉल देऊन करु शकणार बॅलेंस चेक

तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.

यानंतर काही मिनिटांतच तुम्हाला पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.

तुम्ही UMANG अॅपवरुन करु शकता बॅलेंस चेक

तुम्ही सर्वप्रथम UMANG अॅप डाउनलोड करा.

यानंतर ईपीएफओ ऑप्शन निवडा.

यानंतर Employee-Centric Services वर क्लिक करा.

तुम्हाला UAN नंबर टाकून ओटीपी टाकायचा आहे.

यानंतर तुम्ही पीएफबाबत सर्व माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT