Crime News: होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज, संतापलेल्या तरूणाने त्याचा जीव घेतला

Gujarat Youth Killed Over Instagram: इन्स्टाग्रामवर दुसऱ्या व्यक्तीने आपल्या होणाऱ्या बायकोला मेसेज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने या व्यक्तीची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे.
Crime News: होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज, संतापलेल्या तरूणाने त्याचा जीव घेतला
Gujarat Youth Killed Over InstagramSaam Tv
Published On

गुजरातमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी आरोपी राहुल आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दरथरथ नावाची व्यक्ती २८ डिसेंबर रोजी घरीच आली नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना त्याचा मृतदेह ढोलकुंवा गावाच्या जवळ आढळून आला. याप्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.

Crime News: होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज, संतापलेल्या तरूणाने त्याचा जीव घेतला
Maval Crime : तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांगलादेशी घुसखोर ताब्यात; सहा महिन्यांपासून होते वास्तव्यास

राहुलला त्याच्या होणाऱ्या बायकोच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा पासवर्ड माहित होता. त्याने इन्स्टाग्राम लॉग इन केल्यावर त्याला दशरथ नावाच्या व्यक्तीने आपल्या होणाऱ्या बायकोला पाठवलेले मेसेज सापडले. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुलने मित्राच्या मदतीने दशरथची हत्या करण्याचा कट रचला.

Crime News: होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज, संतापलेल्या तरूणाने त्याचा जीव घेतला
Pune Crime: कात्रज घाटामध्ये गोळीबाराचा थरार, जखमी व्यक्तीनेच रचला बनाव; धक्कादायक माहिती उघड

राहुलने दशरथला इन्स्टाग्रामवर मेसेज केले आणि त्याला भेटायला बोलावले. राहुल आणि त्याचा मित्र दशरथला ढोलकुंवा गावामध्ये भेटले. राहुलने दशरथला आपल्या होणाऱ्या बायकोला मेसेज करणं बंद कर असे सांगितले. पण दशरथ नाही म्हणाला. काहीही झालं तरी मी मेसेज करणं बंद करणार नाही. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

या भांडणादरम्यान राहुलने दशरथवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दशरथचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राहुल आणि त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला. दशरथचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघड झाली.

Crime News: होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज, संतापलेल्या तरूणाने त्याचा जीव घेतला
Panvel Crime : कस्टम विभागाने जप्त केलेल्या मालावरच दरोडा; पोलीसांकडून एकजण ताब्यात

पोलिसांनी सांगितले की, राहुलची होणारी बायको ही मेहसाणा येथे राहते. दशरथ आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी धोलाकुंवा येथे गेला होता त्यावेळी त्याने राहुलच्या होणाऱ्या बायकोला पाहिले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये ओळख झाली आणि ते एकमेकांना मेसेज करू लागले. राहुल आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी गांधीनगरला जात असताना अटक केली.

Crime News: होणाऱ्या बायकोला इन्स्टाग्रामवर मेसेज, संतापलेल्या तरूणाने त्याचा जीव घेतला
Pune Crime: शिक्षक की हैवान! शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा छळ, शौचालय साफ करायला लावलं नंतर..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com