Dileep Shankar : प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह; सिनेसृष्टीत एकच खळबळ

Dileep Shankar News Update : प्रसिद्ध अभिनेत्याचा हॉटेलच्या रुममध्ये मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. मल्याळम सिनेसृष्टील प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.
Dileep Shankar News
Dileep Shankar News Twitter
Published On

मुंबई : मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी हाती आली आहे. मल्याळम टीव्ही अभिनेते दिलीप शंकर यांचं निधन झालं आहे. आज रविवारी सकाळी त्यांचा एका हॉटेल रुममध्ये मृतदेह आढळला. टीव्ही शो 'पंचगनी'च्या शुटिंगसाठी त्याच हॉटेलमध्ये थांबले होते. दिलीप शंकर थांबलेल्या हॉटेल रुममधून दुर्गंध येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. दिलीप शंकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिलीप शंकर हे गेल्या चार दिवसांपासून पहिल्या टेलिव्हिजन शो 'पंचाग्नि'च्या शूटिंगसाठी तिरुवनंतपुरमच्या वनरोस जंक्शनजवळ एका हॉटेलात थांबले होते. एर्नाकुलममध्ये लोकांनी अभिनेते दिलीप यांना गेल्या दोन दिवसांपासून हॉटेलच्या बाहेर पाहिलं नव्हतं. रविवारी सकाळी अभिनेते दिलीप शंकर यांच्या घरातून दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाचा उघडून पाहिला. त्यावेळी अभिनेता दिलीप शंकर मृतवस्थेत आढळले.

Dileep Shankar News
Actress Daughter: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची लेक

अभिनेते दिलीप शंकर यांचा मृतदेह हॉटेलच्या रुममध्ये सापडल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना सूचना दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. दिलीप शंकर यांच्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकने म्हटलं की, 'शुटिंगसाठी दोन दिवसांचा ब्रेक होता. या कालावधित दिलीप यांनी त्याच्या इतर सहकाऱ्यांचे फोन घेतले नाहीत. त्यांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दिलीप हे आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरे जात होते, असे त्यांच्या टेलिव्हिजन शोच्या दिग्दर्शनकांनी सांगितलं.

Dileep Shankar News
Actress Fitness Secret: ना जिम केली ना वर्कआउट, या अभिनेत्रीने तंत्राच्या साहय्याने केले वजन कमी...
Dileep Shankar News
Marathi Actress: लाल साडीतली ही परमसुंदरी कोण? जिला पाहताच लागल्या नजरा

मल्याळम फिल्म आणि टेलिव्हिजन जगतातील दिलीप शंकर यांचा प्रसिद्ध चेहरा आहे. दिलीप यांनी 'अम्मारियाथे', 'सुंदरी' आणि 'पंचाग्नि' सारख्या हिट सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. या व्यतिरिक्त 'नॉर्थ २४' आणि 'चप्पा कुरीश' सारख्या हिट सिनेमांमध्येही दिलीप यांनी काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com