

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ.
डीए ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला.
५.१६ लाख कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनधारकांना लाभ.
राज्य शासकीय आणि अन्य पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येणार आहे. यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत निवेदन सादर केले. या निर्णयाचा लाभ राज्यातील ५.१६ लाख कर्मचारी आणि सुमारे ८.७२ लाख निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे.
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारा असा हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ जुलै २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ मध्ये कर्मचाऱ्यांना दिली जाईल.
शासनाच्या या संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. राज्यातील सर्व घटकांसोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेलाही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्यमंत्री जयस्वाल म्हणालेत. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती असून, त्याच प्रकारे ती यापुढे लागू राहील.
यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतनते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात. त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदान भागविण्याचे आदेश सरकारने दिलेत. फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.