Petrol Diesel Price Yandex
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate 31 May 2024: राज्यात पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहेत. आज पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलच्या भावात बदल होतील, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, आजही पेट्रोल डिझेलच्या भावात काहीच बदल झालेला नाही.

रोज सकाळी देशातील इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानंतर देशात पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जातात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ७९.४९ डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल ८३.८० डॉलरवर विकले जात आहे. आज संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत आज पेट्रोल ९४.७१ रुपये तर डडिेलच ८७.६२ रुपयांवर विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९२.१५ रुपये आहे.कोलकत्यात पेट्र्रोल १०३.९४ रुपयांना विकले जात आहे तर डिझेल ९०.७६ रुपयांना विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १००.८५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.४३ रुपयांना विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०४.२३ रुपये तर डिझेल ९०.७५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा भाव १०४.६९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९१.२ रुपयांना विकले जात आहे, कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.४७ रुपयांना तर डिझेल ९१.०१ रुपयांना विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलचा भाव १०४.९९ आहे. तर डिझेल ९१.४८ रुपयांना विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०४.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ विकले जात आहे.

महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील असा अंदाज होता. मात्र, गेल्या ४-५ महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणतीही कपात झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणाची भाषणं होणार? कोण कसं घटनास्थळी पोहोचणार? सत्याच्या मोर्चाबाबत मनसेच्या ज्येष्ठ नेत्याकडून माहिती

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी खुशखबर! १० तोळा सोन्याचे दर २८०० रुपयांनी घसरले; वाचा सविस्तर

Aamir Khan GF Gauri : "कहा से आते हो आप लोग..."; पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर आमिर खानची गर्लफ्रेंड भडकली, पाहा VIDEO

Plum Cake Recipe : महागडा 'प्लम केक' घरीच सिंपल पद्धतीने बनवा, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?

SCROLL FOR NEXT