छत्रपती संभाजीनगर : डोळ्यात मिरचीची पुळ फेकून ११ लाख ३४ हजार रुपये लुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये समोर आली होती. मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकानेच हा लूटमार झाल्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
गोरख सुनील धारबळे (वय २४, रा. कनकसागज) हा महालगाव येथील एका पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून (Sambhajinagar) काम करत होता. दरम्यान पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम महालगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरणा करण्यासाठी तो २७ मे रोजी सकाळी मोटरसायकलने बॅगेत पैसे घेऊन निघाला होता. याच वेळी कारमधून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत रक्कम लंपास केल्याची तक्रार त्याने विरगाव पोलिसात दिली होती. मात्र या प्रकरणात पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता पोलिसांना गुन्हा हा फिर्यादीने (Crime News) साथीदारांच्या मदतीने केल्या असल्याचे कळाले.
तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पोलिसांनी फिर्यादीची चौकशी केली गोरख याने आर्थिक अडचणीमुळे प्रशांत बाळू धारबळे व दीपक अप्पासाहेब धारबळे (दोघेही रा.कनकसागज) या दोन चुलत भावांच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचला असल्याचे कबूल केले. यानंतर (Police) पोलिसांनी प्रशांत व दीपक यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपुस केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खाकी दाखवताच गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी बॅग व १० लाख ५ हजार ६०० रुपये पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जप्त केले आहे. या प्रकरणात गोरख धारबळे, प्रशांत धारबळे व दीपक धारबळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.