Heat Stroke : भंडाऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; आणखी पाच जण घेताय उपचार

Bhandara News : जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
Heat Stroke
Heat StrokeSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : अंगाची लाहीलाही करणारे तापमान सध्या आहे. भंडारा जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे अनेकांना याचा त्रास झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात उष्मघाताचा त्रास होऊन जिल्ह्यात यंदा पहिला मृत्यू झाला आहे. तर आणखी पाचजण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत.

Heat Stroke
Yavatmal News : रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी भीक मांगो आंदोलन; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर येथील भास्कर तरारे (वय ५१) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. उन्हामुळे त्रास जाणवू लागल्याने भास्कर तरारे यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान भास्कर यांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याचे तापमान वाढत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली असून जिल्ह्यात आज ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. 

Heat Stroke
Nanded Water Scarcity : लोहा तालुक्यातील अनेक गावात पाणी बाणी; टंचाई असताना अजूनही गावात टँकर नाही

वाढत्या तापमानामुळे (Temperature) शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले असुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जातो. अश्या परिस्थितीत उन्हाचा त्रास होऊन लोक आजारी पडून लागले आहेत. अश्यातच या उस्माघाताचा पहिला बळी भंडारा जिल्ह्यात गेला असून आणखी पाच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com