Nanded Water Scarcity
Nanded Water ScarcitySaam tv

Nanded Water Scarcity : लोहा तालुक्यातील अनेक गावात पाणी बाणी; टंचाई असताना अजूनही गावात टँकर नाही

Nanded News : कमी पावसामुळे यंदा पाण्याची समस्या सर्व दूर आहे. नांदेड जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची भीषणता जाणवत असून नांदेडच्या लोहा तालुक्यात त्यांचाही समस्या अधिक तीव्र झाली
Published on

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या लोहा तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नद्या, तलाव, कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. दरम्यान लोहा तालुक्यातील हर्बल या गावात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून गावाची लोकसंख्या ४ हजाराच्यावर आहे.

Nanded Water Scarcity
Bhandara News : भंडाऱ्यात मोठी दुर्घटना टळली; वर्दळीच्या परिसरातील विद्युत खांबाला आग

कमी पावसामुळे यंदा पाण्याची समस्या सर्व दूर आहे. नांदेड जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची भीषणता जाणवत असून (Nanded) नांदेडच्या लोहा तालुक्यात त्यांचाही समस्या अधिक तीव्र झाली आहे. लोहा तालुक्यातील अनेक गावात पाण्याची भीषणता तीव्र झाल्याने लांबवरून पाणी आणावे लागत आहे. यात तालुक्यातील हर्बल गावात चार किलोमीटर दूर असलेल्या एका तलावातून पाईप लाईनद्वारे पाणी आणून विहिरीत टाकण्यात येत.या विहिरीत टाकलेले पाणी अत्यंत दूषित आहे. हेच पाणी हर्बल गावातील नागरिकांना प्यावे लागत आहे. 

Nanded Water Scarcity
Yavatmal News : रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी भीक मांगो आंदोलन; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

अजूनही टँकर नाही 

तसेच ताईबाई तांडा येथेही पाणी टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे. जवळपास चारशे लोकसंख्या असलेल्या या तांड्याला एकाच बोअरमधून पाणी घ्यावे लागत आहे. बोअरच्या पाण्याची पातळी कमी झालीय. त्यामुळे अनेकांना पाणीही मिळत नाही. चार किलोमीटर दूरवरून तलावातून ग्रामस्थ दुचाकीवर पाणी आणत आहेत. पाणी टंचाई असताना देखील प्रशासनाने मात्र टँकर सुरू केले नाही. टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com