Bhandara News : भंडाऱ्यात मोठी दुर्घटना टळली; वर्दळीच्या परिसरातील विद्युत खांबाला आग

Bhandara News : विद्युत खांबाला अचानक आग लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. मात्र नागरिकांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले अन् मोठा अनर्थ टळला.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकातील साई मंदिर मार्गावर मोठी दुर्घटना टळली. एका बँकेजवळील विद्युत खांबाला अचानक आग लागली. पहाता- पहाता आगीची तिव्रता वाढत असताना शेजारील लोकांच्या आग लागल्याची लक्षात येताच त्या ठिकाणी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. 

Bhandara News
Muktainagar Accident : भरधाव डंपरने एकाला चिरडले; गाळ उपसून नेताना नदीपात्राजवळच घडली घटना

विद्युत खांबाला अचानक आग (Fire) लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. मात्र नागरिकांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले अन् मोठा अनर्थ टळला. मात्र आग कशी लागली याबद्दल स्पष्टता झालेली नाही. ज्या विद्युत खांबाला आग लागली त्याला लागूनच बँक, निमशासकीय कार्यालये, दुकाने तर दाट वस्ती आहे. हा परिसर वर्दळीचा आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वाढत्या (Temperature) तापमानामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी लोकांच्या समयसुचकतेमुळे आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

Bhandara News
Washim News : महावितरण विरोधात शेलुबाजार येथे छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

सूर्यही तापतोय 

यंदा भंडाऱ्यातील (Bhandara) तापमानाने उच्चांक गाठला असून सूर्य आग ओकत आहे. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच खांबाला आग लागल्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com