Washim News : महावितरण विरोधात शेलुबाजार येथे छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

Washim News : शेलुबाजार परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विजेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Washim News
Washim NewsSaam tv

मनोज जयस्वाल 

वाशिम : मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी आज वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे छत्रपती संभाजीनगर- नागपूर महामार्गावर मुख्य चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर- नागपूर मंगरुळपीर-अकोला महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Washim News
Cotton seeds : कापूस बियाणे निर्धारित किंमतीपेक्षा जास्त दराने विकल्यास कारवाई; कृषी विभागाची आहे नजर

शेलुबाजार परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विजेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत (Mahavitaran) महावितरण कंपनीला अनेक संघटना व नागरिकांनी निवेदन दिले होते. मात्र महावितरण कंपनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त होत शेलुबाजार येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन केले. तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Washim News
Muktainagar Accident : भरधाव डंपरने एकाला चिरडले; गाळ उपसून नेताना नदीपात्राजवळच घडली घटना

महामार्गावर दोन्ही बाजूंनी लागल्या रांगा 

संभाजीनगर- नागपूर महामार्गावर सकाळी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा (Rasta roko) लागल्या होत्या. काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास लावले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com