PM Kisan Yojana: PM किसान योजनेच्या १७ व्या हप्त्याचे पैसे कधी येणार बँक खात्यात? समोर आली मोठी अपडेट

Pm Kisan Yojana 17th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील गरजू शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने चालवली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी 2-2 हजार रुपये दिले जातात. अशातच पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्त्याचे पैसे देण्यात आले आहेत.
Pm Kisan Yojana 17th Installment
Pm Kisan Yojana 17th InstallmentSaam Tv

Pm Kisan Yojana 17th Installment News:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील गरजू शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वतीने चालवली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी 2-2 हजार रुपये दिले जातात. अशातच पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्त्याचे पैसे देण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता जारी करण्यात आला, ज्यामध्ये सुमारे 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले.

यामध्येच 17 वा हप्ता लवकरच जारी होणार आहे, ज्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. मात्र हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर काही काम करून घ्यावे लागेल. त्याचबरोबर हे काम पूर्ण न केल्यास हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

Pm Kisan Yojana 17th Installment
New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान

ई-केवायसी

जर तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल आणि हप्त्याचा लाभ मिळवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. एखाद्या शेतकऱ्याने हे काम न केलास तो हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतो.

जमीन पडताळणी

ज्या शेतकऱ्यांची जमीन पडताळणी झाली नाही, त्यांचा हप्ताही अडकू शकतो. योजनेशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याने हे काम करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा गावप्रमुखाशी संपर्क साधू शकता.

Pm Kisan Yojana 17th Installment
स्पोर्टी लूक अन् जबरदस्त फीचरसह Mahindra XUV 3XO लाँच; किंमत दहा लाखांपेक्षा कमी

या गोष्टीही लक्षात ठेवा

  • तुम्ही अपात्र असाल तर चुकीच्या पद्धतीने कधीही योजनेत सामील होऊ नका.

  • अर्ज करताना फॉर्ममध्ये कोणतीही चूक करू नका.

  • बँक खात्याची योग्य माहिती द्या.

  • तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायला विसरू नका.

17 वा हप्ता कधी जारी केला जाऊ शकतो?

17 वा हप्ता कधी जारी केला जाईल याची कोणतीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, हा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com