स्पोर्टी लूक अन् जबरदस्त फीचरसह Mahindra XUV 3XO लाँच; किंमत दहा लाखांपेक्षा कमी

Mahindra XUV 3XO Car price: देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने ही एसयूव्ही सुसज्ज आहे. XUV 300 असे या नवीन एसयूव्हीचे नाव आहे.
Mahindra XUV 3XO
Mahindra XUV 3XOSaam Tv

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने ही एसयूव्ही सुसज्ज आहे. XUV 300 असे या नवीन एसयूव्हीचे नाव आहे. ही एसयू्व्ही नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची XUV 300 आकर्षक लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारची किंमत ७.४९ लाख रुपये आहे.

डिझाइन

या एसयूव्हीला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. ही एसयूव्ही XUV400 इलेक्ट्रिकसारखीच आहे. ही कार BE- लाइन अपपासून प्रेरित आहे. कारच्या नवीन डिझाइनमध्ये ड्रॉप- डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी आकाराच्या इनसर्ससह नवीन ग्रील सेक्शन आणि हेडलॅम्प देण्यात आला आहे. एसयूव्हीचा मागील भाग नवीन पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे.

Mahindra XUV 3XO
Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

कंपनीने कारच्या केबिनला प्रीमीयम टच दिला आहे. त्यात नवीन डॅशबोर्ड, 10.25 इंफोटेनमेंट सिस्टीम आणि सराउंड राउंट स्पीकर्स असण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीमध्ये रिमोट क्लायमेट कंट्रोल फीचर दिले आहे. जे Adrenox अॅपवरुन ऑपरेट करता येते.या नवीन कारमध्ये कॉम्पॅक्ट एसयू्व्हीमधील सर्वात मोठा सनरुफ देण्यात आला आहे.

ही नवीन कार 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेलसह बाजारात दाखल झाली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही एसयूव्ही ० ते ६० किमी/ ताशी वेग देईल.

Mahindra XUV 3XO
OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com