OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

Ola Cabs CEO Resigns : 'ओला कॅब्स' कंपनी लवकरच १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ही नोकरकपात होण्याआधीच 'ओला कॅब्स'चे सीईओ हेमंत बख्शी यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.
ola car
ola carSaam tv

मुंबई : 'ओला कॅब्स' कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. कंपनी लवकरच १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ही नोकरकपात होण्याआधीच 'ओला कॅब्स'चे सीईओ हेमंत बख्शी यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे. ते जानेवारी २०२४ मध्ये कंपनीत रुजू झाले होते.

तीन महिन्यात हेमंत बख्शी यांनी दिला राजीनामा

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या मीडिया रिपोर्टनुसार, या कंपनीत लवकरच नोकरकपात होण्याची शक्यता आहे. या कंपनीत १० टक्के नोकरकपात होण्याची शक्यता आहे. तर सीईओ हेमंत बख्शी यांनी देखील अवघ्या तीन महिन्यात पदाचा राजीनामा दिला आहे. रिपोर्टनुसार, हेमंत बख्शी हे दुसऱ्या कंपनीत काम करू इच्छित आहे. त्यामुळे ओला कॅब्सच्या नव्या सीईओची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ola car
Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

ओला कॅब्समध्ये मागील काही दिवसांपासून घडामोड पाहायला मिळत आहे. कंपनीच्या आयपीओ विषयी गुंतवणूकदारांमध्ये चर्चा सुरु होती. कार्तिक गुप्ता आणि सिद्धार्थ शकधर हे कंपनीचे नवे सीबीओ झाले आहेत.

ओला कॅब्सने त्यांची इंटरनॅशनल सेवा देखील बंद केली आहेत. कंपनीने ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील व्यवसाय बंद केल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी त्यांचं लक्ष्य भारतावर केंद्रीत केल्याची माहिती आहे. कंपनीचं १०० कोटींहून अधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचं लक्ष्य आहे.

ola car
3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

तत्पूर्वी, ओला मोबिलिटी बिझनेस आर्थिक वर्षात २०२३ मध्ये रेव्हेन्यू २,१३५ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२३ कंपनीने एबिटा २५० कोटी रुपये सकारात्मक होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये एबिटा तोटा ६६ कोटी रुपये झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com