3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

Cheapest Car for Family: अलीकडे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंबे प्रीमियम कारकडे वळताना दिसत आहे. असं असलं तरी आजही देशात एंट्री लेव्हलच्या छोट्या कारच्या मागणीत कोणतीही घट झालेली नाही.
3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी
Maruti Alto K10 Saam Tv
Published On

Cheapest Car for Family:

अलीकडे मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय कुटुंबे प्रीमियम कारकडे वळताना दिसत आहे. असं असलं तरी आजही देशात एंट्री लेव्हलच्या छोट्या कारच्या मागणीत कोणतीही घट झालेली नाही. जर तुम्ही स्वतःसाठी अशी छोटी कार घेण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी अल्टो K10 तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. याची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळणार, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...

इंजिन आणि पॉवर

Alto K10 मध्ये K10C चे 998cc पेट्रोल इंजिन मिळते. जे 49KW पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही कार एका लिटरमध्ये 24.90kmpl मायलेज देते.

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी
Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

म्हणजेच ही कार पॉवर आणि मायलेजच्या बाबतीत खूपच किफायतशीर ठरू शकते. ही कार तुम्ही रोजच्या वापरासाठी वापरू शकता. सिटी ड्राईव्हसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. जास्त ट्रॅफिकमध्ये तुम्ही ही कार सहज चालवू शकता.

या कारमध्ये चांगली स्पेस मिळत आहे. यात चार जण सहज बसू शकतात. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये ड्युअल डिस्क ब्रेकची सुविधा आहे. दैनंदिन वापरासाठी ही चांगली कार सिद्ध होऊ शकते.

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी
400cc चे पॉवरफुल इंजिन, स्टाईश लूक; Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

या कारची रायडींग आणि हाताळणी अधिक चांगली म्हणता येईल. पण आरामाच्या बाबतीत ही कार तुम्हाला निराश करू शकते. या कारमध्ये तुम्ही लांबचा प्रवास केल्यास तुम्हाला पूर्ण थकवा जाणवेल. ही कार लहान प्रवासासाठी योग्य आहे. मात्र लांब ड्राइव्हसाठी नाही. तुम्हाला ही कार CNG पर्यायातही मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com