New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान

Rules Change After 1 May 2024: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्वाचे बदल होत असतात. मे महिन्याच्या पहिल्या तारखेलाही काही नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो.
New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान
New Rules Change from 1st May 2024Saam Tv
Published On

एप्रिल महिन्याचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवीन महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्वाचे बदल होत असतात. मे महिन्याच्या पहिल्या तारखेलाही काही नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या बदलाची माहिती आधीच असणे गरजेचे आहे.

New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान
स्पोर्टी लूक अन् जबरदस्त फीचरसह Mahindra XUV 3XO लाँच; किंमत दहा लाखांपेक्षा कमी

प्राप्त माहितीनुसार, १ मेपासून IDFC फर्स्ट बँक, येस बँक आणि ICICI बँकांनी त्यांचे बचत खात्यावरील शुल्क वाढवले आहेत. तसेच क्रेडिट कार्ड धारकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १ मेपासून त्यांना अतिरिक्त कर भरावा लागू शकतो. दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत देखील बदल होणार आहे.

LPG सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार?

देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो. एलपीजी सिलिंडरची पहिल्याच तारखेला १४ आणि १९ किलो सिलिंडरच्या किमती जाहीर करतात. यासोबत सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही मोठा बदल होऊ शकतो.

येस बँकेच्या शिल्लक मर्यादेत बदल

येस बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, १ मेपासून विविध प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लकमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता येस बँकेच्या प्रो-मॅक्स बचत खात्यांसाठी किमान सरासरी शिल्लक ५०,००० रुपये आणि कमाल शुल्क १,००० रुपये करण्यात आले आहे.

ICICI बँकेच्या सेवा शुल्काचे नियम बदलणार

ICICI बँकेने आपल्या बचत खात्याशी संबंधित सेवा शुल्काचे नियमही बदलले आहेत. आता डेबिट कार्डसाठी ग्राहकांना शहरी भागात २०० रुपये आणि ग्रामीण भागात ०० रुपये वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच बँकेने २५ पानांच्या चेकबुकसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य

आता महत्वाच्या कागदपत्रांवर आईचे नावही असणे अनिवार्य आहे. अलिकडे महाराष्ट्र सरकारने याबाबत निर्णय घेतला होता. आता या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून करण्यात येणार आहे. त्यानुसार, आता जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, मालमत्तेची कागदपत्र, आधार आणि पॅन कार्डवर आईचे नाव अनिवार्य असेल.

ज्येष्ठ नागरिकांना वाढीव संधी

HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १० मे आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.७४५% अतिरिक्त व्याजदर उपलब्ध आहे.

New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान
OLA Layoffs : 'ओला'मधील 10 टक्के कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; CEO बख्शींनी दिला ३ महिन्यात राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com