Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?

Petrol Diesel Price Today 5th September 2024: राज्यात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे नवे दर जाहीर करत असतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. सणासुदीच्या दिवसात अनेकजण नवीन काहीतरी खरेदी करतात. त्यात अनेकजण वाहन खरेदी करतात. वाहन खरेदी करण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. परंतु पेट्रोल डिझेलचे भाव काही कमी होत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नसल्याने अनेकांच्या महिन्याच्या खर्चात वाढ होते.

पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु ऐन सणासुदीच्या दिवसात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर असल्याचे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोलचे भाव १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०२ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०३.८० रुपये आहे तर डिझेल ९०.३४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. नागपूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी १०४ रुपये मोजावे लागत आहे तर डिझेलची किंमत ९०.५६ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.२१ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०५.६२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९२.१० रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल १००.८५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT