Kolkata Doctor Case : मला अडकवलं जातंय, डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती; कोलकाता डॉक्टर प्रकरणात आरोपीचा खळबळजनक दावा

Kolkata Doctor Physically Abused Case : कोलकाता डॉक्टरच्या हत्येप्रकरणात आरोपीने नवीन दावा केलाय. या प्रकरणामध्ये त्याला जाणुनबूजून अडकवलं जात असल्याचा आरोप त्याने केलाय.
  डॉक्टरवर अत्याचार
Kolkata Doctor Murder CaseSaam Tv
Published On

मुंबई : कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणात मोठं अपडटेट समोर आलंय. या प्रकरणातीसल आरोपी संजय रॉयने एक खळबळजनक वक्तव्य केलंय. त्याने त्याच्या वकिलांना सांगितलंय की, तो निर्दोष आहे. या प्रकरणात त्याला अडकवलं जात असल्याचा आरोप त्याने केलाय. त्यामुळे या प्रकरणातील ट्विस्ट अजूनच वाढल्याचं दिसत आहे.

आरोपी काय म्हणतो?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्या प्रकरणात संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याची पॉलीग्राफ चाचणी देखील करण्यात (Kolkata Doctor Physically Abused Case) आली. त्याने या पॉलीग्राफ चाचणीदरम्यान निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार त्याने आपल्या वकिलांना सांगितलं होतं, की त्याने या महिला डॉक्टरची हत्या केलेली नाही. तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, ते भयंकर दृश्य पाहून तो पळून गेला होता.

कोलकाता डॉक्टर हत्या आणि बलात्कार प्रकरण

पॉलीग्राफी चाचणीदरम्यान संजय रॉयला दहा प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये पीडित महिलेची हत्या केल्यानंतर पुढे काय केले? हा देखील एक प्रश्न होता. त्याने सीबीआय अधिकाऱ्यांना म्हटलं होतं की, त्याला विचारलेला हा प्रश्न चुकीचा (Kolkata Doctor Case) आहे. कारण त्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा खून केलेला नाही. पॉलीग्राफ चाचणीत संजयने दावा केलाय की, ९ ऑगस्ट रोजी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये गेल्यानंतर त्याला सदर डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत पडलेली असल्याचं दिसलं होतं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिला डॉक्टरला पाहून त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता.

  डॉक्टरवर अत्याचार
Kolkata Doctor Murder Case: डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मृतदेहाशी संबंध ठेवण्याचं वेड; CBI च्या तपासात धक्कादायक खुलासा

आरोपीची बाजू...

माध्यमांशी बोलताना आरोपी संजय रॉयच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितलं की, जर एखाद्याला त्या हॉलमध्ये प्रवेश करणे इतके सोपे होते, तर संजय व्यतिरिक्त इतर कोणीही तेथे जाण्याची शक्यता आहे. या महिला डॉक्टरला (Physically Abused) ओळखत नसून त्याला या प्रकरणामध्ये अडकवलं जात असल्याचा दावाही संजय रॉयनी केलाय. त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची भीती वाटत असल्यामुळे पोलिसांना कळवले नव्हते, असं देखील संजयने सांगितले.

मागील महिन्यामध्ये कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी असणाऱ्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये (Kolkata Doctor Case Latest Update) तिच्या शरीरावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या जखमा आढळल्या आहेत. प्राथमिक तपासात आढळलेल्या अनेक पुराव्यांच्या आधारे आरोपी संजय रॉय याला अटक करण्यात आली होती.

  डॉक्टरवर अत्याचार
Kolkata Doctor Death Case : कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मृत्यूच्या वेळेबाबत मोठी माहिती समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com