पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरणार
कच्च्या तेलाचे दर प्रति लिटर १८ रुपयांपेक्षा कमी होणार
कच्च्या तेलाच्या किंमती घसल्यानंतर इंधन स्वस्त होणार
देशातील कोट्यवधी लोकांकडे वाहने आहेत. त्यातील अनेक लोक रोज खाजगी वाहनांनी प्रवास करतात. ऑफिस, कॉलेजला जाताना बाईक किंवा कार घेऊ जातात. रोज पेट्रोल आणि डिझेलसाठी पैसे मोजावे लागतात. सध्या पेट्रोलचे दर १०३ आणि डिझेल ९१ रुपयांवर विकले जात आहेत. दरम्यान, आता पेट्रोल डिझेलचे दर कमी होणा असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या पाण्यापेक्षा कमी होऊ शकतात. जागतिक एजन्सी जेपी मॉर्गनने याबाबत भविष्यवाणी केली आहे. येत्या दोन वर्षात कच्चे तेल खूप स्वस्त होणार आहे. २०२७ पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ३० डॉलर प्रति बॅरल होऊ शकतात.
१ लिटर कच्च्या तेलाची किंमत १८ रुपयांपेक्षा कमी
भारतीय रुपयानुसार कच्च्या तेलाचे दर ९५ रुपये प्रति बॅरल होईल. एका बॅरलमध्ये १५९ लिटर कच्चे तेल असते. एका बॅरलची किंमत २८५० रुपये होईल. त्यामुळे एका लिटर कच्च्या तेलाची किंमत १७.९० रुपये होऊ शकते. हे दर एका पाण्याच्या बॉटलपेक्षा कमी आहे. पाण्याची बॉटल ही १८ ते २० रुपयांना मिळते.
जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, कच्च्या तेलाचे हे दर भारतासाठी महत्त्वाचे आहे. भारत देश हा कच्च्या तेलावर अवलंबून आहे. भारत ८६ टक्के कच्चे तेल हे इतर देशांकडून घेतो. जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, ब्रेंट क्रूडच्या किंमती या ५० टक्के कमी होऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ६२ डॉलरवर विकले जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणे हे कच्च्या तेलाच्या घसरणीमागचे कारण असू शकते.
पुढील तीन वर्षात जागतिक तेलाचा वापर वाढण्याचा अंदाज असला तरीही पुरवठा मागणीपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. २०२५ मध्ये तेल मागणी ०.९ दशलक्ष बॅरल प्रतिदिन वाढण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये ही वाढ स्थिर राहण्याची शक्यता आहे. २०२७ मध्ये २.२ एमबीपीडीपर्यंत पोहचू शकते.२०२५ आणि २०२६ मध्ये पुरवठा हा मागणीपेक्षा तिप्पट वेगाने वाढले. २०२७ मध्ये पुरवठा हा वापरापेक्षा जास्त होईल. परिणामी इंधनाच्या किंमती घसरतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.