ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुडघ्यांचे दुखणे थांबवण्याकरिता मसाजची गरज असते. मसाज केल्याने गुडघ्यांना आराम मिळतो.
तसेच गुडघ्याच्या मसाजाकरिता जर चांगले गुणकारी तेल मिळाले तर चांगला आराम मिळतो. तर जाणून घ्या घरगुती तेलाचा उपाय.
तेल बनवण्याकरिता १ कप राईचे तेल, ८ ते १० लसूनच्या पाकळ्या, १ चमचा मेथी दाणे, १ चमचा कापूर आणि १ चमचा ओवा.
सर्वात आधी एका कढईत १ कप राईचे तेल घेऊन ते मंद आचेवर गरम करा.
नंतर यात लसूनच्या पाकळ्या, मेथी दाणे आणि ओवा टाकून तेल उकळवून घ्या.
तेल थंड करत ठेवा . तेल थंड झाल्यावर एका कोचेच्या बॉटलमध्ये भरा आणि मग त्यात कापूर मिसळा.
हे तेल रोज झोपण्याआधी गुडघ्यांना लावून मसाज करा आणि मग झोपा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.