E20 Petrol: तुमची गाडी E20 पेट्रोलला सपोर्ट करते का हे कसे ओळखाल?

Dhanshri Shintre

मॅन्युअल पाहा

वाहनाच्या मॅन्युअलमध्ये इंधनाची माहिती दिलेली असते. जर "E20 Compatible" किंवा "20% पर्यंत इथेनॉल" असा उल्लेख असेल, तर ते इंधन वापरण्यास योग्य आहे.

इंधन टाकीच्या कॅपवर स्टिकर

काही वाहन कंपन्या इंधन टाकीच्या झाकणावर किंवा कॅपवर "E20" किंवा "E20 Ready" असे स्टिकर्स लावतात, ज्यामुळे इथेनॉल सुसंगतता सहज ओळखता येते.

अधिकृत वेबसाइट

वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा प्रेस रिलीझद्वारे कोणती मॉडेल्स E20 इंधनासाठी सुसंगत आहेत याबाबतची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देतात.

आरसी किंवा स्पेसिफिकेशन शीट

काही नव्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रात किंवा स्पेसिफिकेशन शीटमध्ये वापरले जाणारे इंधन स्पष्टपणे नमूद केलेले असते, ज्यामुळे ग्राहकांना योग्य इंधन निवडणे सोपे जाते.

सर्व्हिस सेंटरमध्ये चौकशी

तुमच्या वाहनाच्या अधिकृत डीलरशीप किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये चौकशी करून तुम्ही सहज जाणून घेऊ शकता की तुमचे वाहन मॉडेल E20 इंधनासाठी सुसंगत आहे की नाही.

वर्ष पाहा

भारत सरकारने २०२३ पासून E20 सुसंगत वाहने तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २०२३ नंतर खरेदी केलेली वाहने E20 समर्थित असण्याची शक्यता जास्त आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल

वाहनाच्या कागदपत्रांमध्ये किंवा उत्पादकाकडून E20 विषयी स्पष्ट माहिती नसेल, तर इंजिन सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त E10 म्हणजेच 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरणे योग्य आहे.

NEXT: ई-स्कूटर खरेदी करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, निवडताना काय तपासावे?

येथे क्लिक करा