गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, आता पेट्रोल डिझेलचे भाव कमी होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किंमती कमी असल्याने कदाचित पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते. जर असे झाले तर सर्वसामान्यांनना मोठा दिलासा मिळणार आहे. (Petrol Diesel Price)
सध्या इतर देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमत या ७० डॉलर प्रति बॅरलवर विकल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमत ६६ डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. तज्ञांच्या मते, इतर देशातही लवकरच तेल ६५ डॉलरवर व्यव्हार करु शकात. यामुळे भारताला दिलासा मिळणार आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा क्रूड ऑइल आयात करणारा देश आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यावर आपोआप देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात.
दरम्यान, आखाती देशांचा समूह ओपेकने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवला आहे. त्यामुळेदेखील कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने कॅनडा, मेकिस्के आणि चीन या देशांवर शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे टेन्शन वाढले होते. मात्र,आता कदाचित कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊ शकतात. (Petrol Diesel Price Fall)
आंतरराष्ट्रीय बाजारात काल ब्रेंट क्रूड ऑइल २.४५ टक्क्यांनी घसरले होते. तर आज किंचिंत वाढ झाली आहे. परंतु त्याने फारसा फरक पडणार नाही.सलग तिसऱ्या दिवशी तेल प्रति बॅरल ७० च्या खाली विकले जात आहे. त्यामुळे कदाचित पेट्रोल डिझेलचे भाव घसरु शकतात.
जर कच्च्या तेलाच्या किंमती अशाच राहिल्या तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होऊ शकतात. जर क्रूड ऑइल ६५ ते ७० डॉलरवर असले तर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ३ ते ५ रुपयांनी कपात होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.