Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price: युद्धामुळे इंधनाच्या किंमतीचा भडका! पेट्रोल ₹४०० पार; या देशाने घेतला मोठा निर्णय

Petrol Diesel Price Hike: आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम इंधनाच्या किंमतीवर झाला आहे. अनेक देशांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. श्रीलंकेत पेट्रोलची किंमत ४०० रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

Siddhi Hande

युद्धाचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर

श्रीलंकेत पेट्रोल महागलं

श्रीलंकेत पेट्रोलच्या किंमती ४०० रुपयांपेक्षा जास्त

पूर्व मध्य आखाती देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाचा परिणाम जगावर होताना दिसत आहे. जागतिक स्तरावरील व्यापारांवर याचा परिणाम होतो. दरम्यान, आता युद्धामुळे पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किंमती वाढताना दिसत आहे. श्रीलंकेत एका दिवसात इंधनाच्या किंमत २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

युद्धाचा परिणाम पेट्रोल डिझेलवर

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम अनेक देशांवर होताना दिसत आहे. यामुळे महागाई वाढत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला आहे. एका आठवड्यात जवळपास दुसऱ्यांदा पेट्रोलच्या किंमची वाढल्या आहेत. १ मार्चपासून तिसऱ्यांदा इंधनाच्या किंमती वाढवण्यात आला आहे.

युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ही सामुद्रधुनी देशांमध्ये व्यापार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गाद्वारे अनेक राज्यांमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. परंतु आता या सामुद्रधुनी परिसरात युद्धाची परिस्थिती आहे. त्यामुळे जगभरातील सर्वच देशांना फटका बसत आहे.

दरवाढीनंतर, श्रीलंकेत ऑटो डिझेलची किंमती ३०३ रुपयांवरुन ३८२ रुपये प्रति लिटर झाली आहे. सुपर डिझेलची किंमत ३५३ वरुन ४४३ रुपये झाली आहे. ९२ ऑक्टोन पेट्रोलची किंमत ३१७ वरुन ३९८ झाली आहे. तर ९५ ऑक्टेन पेट्रोलची किंमत ३६५ वरुन ४५५ झाली आहे. रॉकेलच्या दरातही ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

श्रीलंकेतील इंधनाच्या किंमती २०२२ नंतर पहिल्यांदा एवढ्या महागल्या आहेत.२०२२ मध्ये पहिल्यांदाच श्रीलंकेला दिवाळखोरीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर महागाई खूप जास्त वाढली होती. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. इंधनाचे दर खूप जास्त वाढले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT