इराणच्या हल्ल्यांमागे चीनचा हात ? इराण-अमेरिका युद्धात चीनची उडी ?

Iran-Israel War: युद्धातून मागे हटायला तयार नसलेल्या इराणचे इस्त्रायलसह आखाती देशांवर हल्ले सुरूच आहेत. अशातच आता अमेरिकेनं केलेल्या दाव्यामुळे या युद्धाला नवी किनार लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं केलेला दावा नेमका काय आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Rising tensions in the Middle East as US report alleges China’s support to Iran in ongoing attacks
Rising tensions in the Middle East as US report alleges China’s support to Iran in ongoing attacksSaam Tv
Published On

इस्त्रायल-अमेरिकाविरोधातील युद्धाला 19 दिवस लोटलेत आणि इराणनं दोन्ही देशांना सळो की पळो करून सोडलंय. या युद्धात इराणनं आखातातील देशांवर हल्ले करून आपल्या लष्करी ताकदीचं प्रदर्शन केलंय. अशातच आता 'यू.एस.-चायना इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन'च्या अहवालानं जगभरात खळबळ उडालीये. या अहवालात थेट चीनने इराणला मदत केल्याचं समोर आलाय.

या अहवालानुसार, चीनने इराणला आक्रमक ड्रोन, रॉकेट इंधनासाठीची रसायनं आणि सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम पुरवल्या आहेत. याचा वापर पश्चिम आशियामध्ये हल्ले करण्यासाठी केला जात आहे. तसंच, चीननं इराणला रॉकेट इंधन उत्पादनासाठी आवश्यक असणारे सोडियम परक्लोरेट विकण्याची परवानगी दिली होती. महत्त्वाचं म्हणजे, चीनने जानेवारी 2025 मध्ये इराणला अंदाजे 1000 टन सोडियम परक्लोरेट देखील पाठवलं होतं. एवढंच नाही तर इराण सध्या पश्चिम आशियामध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी चीनच्या उपग्रह दिशादर्शन प्रणालीचा वापर करत आहे.

एवढच नाही तर या अहवालानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या काही दिवस आधी चीनने इराणला शस्त्र विकली होती.तसंच आक्रमक ड्रोन आणि जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्रे विकण्याचा एक मोठा करारही जवळपास अंतिम झाला होता. दरम्यान मागे हटायला तयार नसलेल्या इराणचे इस्रायल आणि आखाती देशांवर हल्ले सुरूच आहेत.अमेरिकेनं केलेल्या दाव्यानुसार इराणच्या हल्ल्यामागे जर चीनी तंत्रज्ञान असेल तर इराणला रोखणं इस्त्रायल अमेरिकेसमोरील मोठं आव्हान असेल एवढंच नाही तर युध्द अधिक काळासाठी लांबण्याचीही शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com