Pan Card  Saam Tv
बिझनेस

Pan Card: पॅन कार्ड रिन्यू कसं करायचं? घसबसल्या ५ मिनिटांत करा ऑनलाइन प्रोसेस

Pan Card Renewal Process: पॅन कार्ड हे भारतीयांसाठी खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. पॅन कार्ड तुम्हाला काही कालावधीनंतर रिन्यू करावे लागते. त्यासाठी ऑनलाइन प्रोसेस वाचा.

Siddhi Hande

भारतीय नागरिकांसाठी काही ओळखपत्र आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डचा समावेश आहे. दरम्यान कोणतेही आर्थिक व्यव्हार करण्यासाठी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. प्रत्येक १८ वर्षांवरील व्यक्तीकडे पॅन कार्ड असते. दरम्यान, काळानुसार पॅन कार्डदेखील जुने होते. पॅन कार्डवरील अनेक अनेक माहिती पुसट होते. त्यामुळे अनेक ठिकाणी हे पॅन कार्ड वापरता येत नाही. यावेळी तुम्ही पॅन कार्ड रिप्लेस करु शकतात. पॅन कार्ड रिप्लेस करण्याची प्रोसेस ऑनलाइन आहे. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने पॅन कार्ड रिप्लेस करु शकतात.

या वेबसाइटवरुन करा पॅन कार्ड रिन्यू

पॅन कार्ड रिन्यू करण्यासाठी सरकारी वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही NSDL किंवा UTIITSL या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यामध्ये तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी अॅप्लिकेशन, डुप्लीकेट कार्ड, अपडेट या सेवा उपलब्ध आहेत. यानंतर तुम्ही या ऑप्शनवर जाऊन लॉग इन करा.

यानंतर तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर 49A फॉर्म आणि परदेशात राहत असाल तर 49AA हा फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरताना नाव, जन्मतारीख, पत्ता याबाबत सर्व माहिती अचूक भरा.

अशा पद्धतीने करा अर्ज

पॅन कार्ड रिन्यू करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती अचून द्यायची आहे. तुमच्याकडे आधार कार्ड, वोटर आयडी आणि पासपोर्ट हे कागदपत्रे आवश्यक आहेत. पत्त्यासाठी वीजेचे बिल, बँक स्टेटमेंट असणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा कागदपत्र स्कॅन कराल तेव्हा विशेष काळजी घ्या.कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला ११० रुपये शुल्क भरायचे आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने फी भरु शकतात.

पोस्टाद्वारे पाठवले जाईल पॅन कार्ड

तुम्ही सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पॅन कार्ड रिन्यू होईल. यानंतर तुमच्या पत्त्यावर पॅन कार्ड पाठवले जाईल. यासाठी तुम्हाला काही आठवडे लागतील. तुम्ही डिलिवरी स्टेट्‍स पोस्टल ट्रॅकिंग नंबरवर चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : प्रसिद्ध मॉलमध्ये सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी; IT कर्मचाऱ्याला बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकार?

Beed News: बीडकरांचे स्वप्न साकार : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा पहिला टप्पा सुरू|VIDEO

Healthy Diet: व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करा! आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश, ठरेल फायदेशीर

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Virar Tourism: नक्की खंडाळा, माथेरान विसराल! विरारजवळ अवघ्या 10 किमी अंतरावर असलेली ही जागा देईल हिल स्टेशनचा अनुभव

SCROLL FOR NEXT