Aadhaar-Pan Card Update: आधार-पॅनमध्ये नाव, जन्मतारीख वेगवेगळी; कामं रखडतील, घरबसल्या करा दुरुस्त, सोप्या टिप्स

How To Correct Name In Aadhaar-Pan Card For ITR: जर तुमच्या पॅन आणि आधार कार्डमधील नाव किंवा जन्मतारीख वेगळी असेल, तर आयटीआर फाइलिंग आणि बँकिंगचे काम रखडू शकते. घरबसल्या आधार-पॅन करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
aadhaar-pan
aadhaar-pangoogle
Published on
aadhaar-pan
aadhaar-pangoogle

पॅन आणि आधार कार्ड

सरकारने विविध कामे सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. नावातील स्पेलिंग चुका किंवा वेगवेगळी जन्मतारिख यासारख्या गोष्टींमुळे, पॅन आणि आधार लिंक करता येत नाहीत. याशिवाय आयकर रिटर्न ITR भरताना अनेक समस्या येऊ शकतात. तसेच, वेळेत दुरुस्त न केल्यास, पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट होऊ शकतो.

aadhaar-pan
aadhaar-pangoogle

घरबसल्या करा आधार-पॅन दुरुस्त

सरकारने या डॉक्युमेंट्समध्ये बदल करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. आधार किंवा पॅनमध्ये चूक असली तरी, तुम्ही नाव, जन्मतारीख किंवा इतर वैयक्तिक माहिती दुरुस्त करून दोन्ही सहजपणे लिंक करू शकता.

aadhaar-pan
aadhaar-pangoogle

पॅन आणि आधार का लिंक होत नाही?

जर तुमचे नाव पॅन कार्डमध्ये नीतीश शिंदे असेल आणि आधारमध्ये नीतीश शर्मा असे लिहिले असेल, तर सिस्टम या माहितीला जुळत नसल्याचे दाखवेल. तसेच जन्मतारीख किंवा लिंग माहिती वेगळी असल्यास लिंकींग होणार नाही. यामुळे ITR फाइलिंग आणि बँक संबंधित अनेक कामांमध्ये समस्या निर्माण होतात. म्हणून, पॅन आणि आधार दोन्हीमधील माहिती सारखीच असणे महत्वाचे आहे.

aadhaar-pan
aadhaar-pangoogle

वेगवेगळ्या माहितीमुळे कोणती कामे रखडतात?

आयटीआर दाखल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक्ड असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या माहितीमुळे रिटर्न रिजेक्ट होऊ शकतो. जर दोन्ही लिंकिंग अयशस्वी झाले तर पॅन नंबर अवैध मानला जाईल. पॅन-आधारमधील वेगळ्या माहितीमुळे बँक खाती, कर्ज प्रक्रिया आणि गुंतवणूकीशी संबंधित कामे थांबू शकते.

aadhaar-pan
aadhaar-pangoogle

आधारमधील माहिती दुरुस्त करण्याची ऑनलाइन पद्धत

UIDAI च्या वेबसाइटला भेट द्या. आधार क्रमांक एंटर करा आणि OTP प्रविष्ट करुन लॉगिन करा. 'Update Demographics' विभागात नाव किंवा जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी पर्याय निवडा. योग्य माहिती भरा आणि वैध कागदपत्रे जसे की, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट अपलोड करा. सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक URN (अपडेट रिक्वेस्ट नंबर) मिळेल ज्याद्वारे तुम्ही स्टेटस ट्रॅक करू शकता.

aadhaar-pan
aadhaar-pangoogle

पॅनमधील माहिती दुरुस्त करण्याची ऑनलाइन पद्धत

NSDL/UTIITSL पोर्टल उघडा. 'Changes or Correction in PAN Data' वर क्लिक करा. पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे जसे की, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड अपलोड करा.यासाठी ११० रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. फॉर्म सबमिट केल्यावर, तुम्हाला एक पावती स्लिप मिळेल ज्यावरून तुम्ही स्टेटस ट्रॅक करु शकता.

aadhaar-pan
aadhaar-pangoogle

पॅन आणि आधार अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे

नाव दुरुस्तीसाठी पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, विवाह प्रमाणपत्र लागतील तर जन्मतारीख दुरुस्तीसाठी जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला लागेल. ओळखपत्राच्या पुराव्यासाठी पासपोर्ट आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे

aadhaar-pan
aadhaar-panSaam Tv

पॅन आणि आधार कसे लिंक करायचे?

सर्वप्रथम, पॅन आणि आधार दोन्हीमध्ये योग्य माहिती प्रविष्ट केली आहे याची खात्री करा. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर जा. “Link Aadhaar” पर्याय निवडा. यानंतर पॅन,आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा. आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर प्रविष्ट करा. यानंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा. यानंतर तुम्हाला आधार-पॅन लिंक्ड झालेलेा मेसेज दिसेल.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com