Financial Transaction Stop : आधार कार्ड व पॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रातील एक आहे. अशातच केंद्र सरकारने ३० मार्चला आधार-पॅन लिंकची तारीख वाढवण्यात आली असून ती ३० जूनपर्यंत करण्यात आली होती.
सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकरणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला आधार कार्डशी लिंक केले नाही त्यामुळे १ जुलै २०२३ पासून पॅनकार्ड इनअॅक्टिव्ह झाले आहे. या पुढे त्यांना ही १२ महत्त्वपूर्ण कामे करता येणार नाही.
आयकर नियमानुसार 1961 च्या कलम 139AA अंतर्गत आधार व पॅन कार्ड (Pan Card) लिंक करणे अनिवार्य करण्यात आले होते. गुंतवणूक (Investment), कर्ज घेताना किंवा इतर व्यावसायिक कामे करताना पॅन कार्ड हे अधिक गरजेचे आहे. परंतु आयकर नियमाच्या आयकर कलम 114B मध्ये नमूद केल्यानुसार देशातील कोणत्या आर्थिक व्यवहारांसाठी, पॅन कार्ड अधिक आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, पॅन कार्ड इनअॅक्टिव्ह झाल्यास तुम्हाला हे १२ व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात.
1. बँक (Bank) खाते उघडण्यासाठी पॅन कार्डचा तपशील द्यावा लागतो, फक्त 'बेसिक सेविंग्स बँक डिपॉजिट अकाउंट उघडण्यासाठी पॅन कार्डमध्ये सूट मिळू शकते.
2. बँक खात्यात 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा करण्यासाठी पॅन कार्ड द्यावे लागते किंवा यासाठी तुम्ही डिजिटल व्यवहार करु शकता.
3. शेअर बाजारातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी तुम्हाला डीमॅट खाते आवश्यक आहे. डीमॅट खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड हे अधिक आवश्यक आहेत.
4. डेबिट किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करतानाही तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक द्यावा लागतो.
5. विम्याचा हप्ता 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास पॅन कार्ड क्रमांक द्यावा लागेल.
6. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये एका वेळी 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख पेमेंट करण्यासाठी पॅन तपशील आवश्यक आहेत.
7. एकावेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा परदेशी प्रवासासाठी रोख पेमेंटसाठी पॅन कार्ड गरजेचा आहे.
8. 50,000 रुपयांपेक्षा जास्त म्युच्युअल फंड पेमेंटसाठी, तुम्हाला पॅन तपशील देणे आवश्यक आहे.
9. कंपनीचे डिबेंचर्स किंवा बॉण्ड्स खरेदी करण्यासाठी 50,000 रुपये भरण्यासाठी पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल.
10. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या रोख्यांच्या खरेदीसाठी पैसे भरण्यासाठी पॅन कार्ड द्यावे लागेल.
11. डिमांड ड्राफ्ट, पे-ऑर्डर किंवा बँकरचे चेक फॉर्म खरेदी करून एका दिवसात बँकेकडून 50,000 रुपये किंवा त्याहून अधिकची पेमेंट करण्यासाठी पॅन कार्ड तपशील द्यावा लागतो.
12. 50,000 रुपयांपेक्षा जास्त आणि आर्थिक वर्षात एकूण 5 लाख रुपयांच्या बँकेत मुदत ठेवींसाठी पॅन कार्ड तपशील देणे आवश्यक आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.