Indian Railways Room Booking : रेल्वेची नवीन सुविधा ! 100 रुपयांत बुक करता येणार हॉटेलसारखी रुम, कशी कराल?

IRCTC Retiring Room Booking: रेल्वे स्टेशनजवळ कमी किंमतीत मिळणार हॉटेलसारखा रुम बुक करु शकतो.
Indian Railways Room Booking
Indian Railways Room BookingSaam tv
Published On

IRCTC Retiring Room : भारतीय रेल्वे आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नव्या सुविधा देत असते. ज्यामुळे ग्राहकांचा प्रवास अधिक सुखकर होईल. सणांच्या दिवशी किंवा सुट्टीच्या काळात विशेष रेल्वे चालवून प्रवाशांना दिलासा दिला जातो.

तसेच तिकीट बुकिंग करताना व इतर सुविधा वेळोवेळी दिल्या जातात. परंतु, रेल्वेच्या अशा अनेक सुविधा आहेत ज्याबद्दल अनेक प्रवाशांना माहित नाही. आज अशाच एका सुविधेबद्दल आपण जाणून घेऊया.

Indian Railways Room Booking
LPG Cylinder Price : एलपीजीचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार का कात्री? तपासा तुमच्या शहरातील दर

जर तुम्ही रेल्वेने (Railway) प्रवास (Travel) करत असाल आणि काही कारणास्तव तुम्हाला स्टेशनजवळच थांबायचे असेल तर तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही. अतिशय कमी किंमतीत आपण हॉटेलसारखी रुम बुक (Book) करु शकतो. कसे बुक कराल हे जाणून घेऊया

1. हॉटेलसारखी रुम मिळेल १०० रुपयांत

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना राहण्यासाठी हॉटेल सारख्या खोल्यांची सोय करण्यात आली आहे. ही खोल अगदी हॉटेल सारखी असेल. यामध्ये आपल्याला एसी रुम, झोपण्यासाठी बेड व इतर अत्यावश्यक असणाऱ्या सुविधा मिळतील. रात्री रुम बुक करण्यासाठी तुम्हाला १०० ते ७०० रुपये मोजावे लागतील.

Indian Railways Room Booking
Priya Varrier : आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा, लिपस्टिक तुझ्या ओठांची; मला पागल करतेय ग...!

2. बुकिंग कसे कराल ?

  • जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर हॉटेलसारखी खोली बुक करायची असेल, तर तुम्ही याप्रकारे बुक करु शकता

  • यासाठी तुम्हाला IRCTC अकाउंट ओपन करावे लागेल

  • आता लॉगिन करा आणि माय बुकिंग वर जा

  • रिटायरिंग रूमचा पर्याय तुमच्या तिकीट बुकिंगजवळ दिसेल

  • तेथे क्लिकवर तुम्हाला रूम बुक करण्याचा पर्याय दिसेल

  • पण काही वैयक्तिक माहिती आणि प्रवासाची माहिती भरावी लागेल

  • आता पैसे भरल्यानंतर तुमची रुम बुक होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com